_MPC_DIR_MPU_III

Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पाच सराईत चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी आणि पाकीट चोरी करणा-या पाच सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हा शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.

_MPC_DIR_MPU_IV

किरण अजिनाथ गायकवाड (वय 19, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड), पप्पू अमृत जाधव (वय 30, रा. महेंद्रगिरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), अमोल बाबासाहेब गित्ते (वय 23, रा. लोहगाव, खांडगाव, पाथर्डी, जि. अहमदनगर), जगना बंडू नायक (वय 30, रा. ओडिसा), अनिल नागराव ढगे (वय 39, रा. गणेशनगर, नांदेड) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II
  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक-भक्त आणि शेकडो दिंड्या दाखल झाल्या. या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्यासाठी आरोपी चोरटे आळंदीत आले. चोरी आणि पाकीटमारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी देखील चोख तयारी केली होती.

पोलिसांनी वरील पाच जणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पाकीट मिळाले. त्यात 1 हजार 600 रुपये होते. पाकीटमध्ये असलेल्या ओळखपत्रावर संपर्क केला असता ते पाकीट चोरीला गेल्याचे समजले.

  • यावरून पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, अटक केलेल्या पाचही आरोपींची माहिती मागवली असता त्यांच्यावर चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे उघडकीस आले. जगना बंडू नायक याच्यावर महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यात एकूण 18 चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.