Alandi : अपरा एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : आज आळंदीमध्ये अपरा एकादशी निमित्त (Alandi) श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी माऊलीं मंदिरामध्ये गर्दी केली होती. अपरा एकादशी निमित्त अभिनव भारती यांच्या सौजन्याने आकर्षक अशी मंदिरामध्ये रांगोळी काढण्यात आली होती.

मंदिरामध्ये आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती. देवस्थान तर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात प्रसादाचा आस्वाद भाविक घेताना दिसत होते.

Chinchwad: विधानसभा अध्यक्षांना रिझनेबल टाईम समजतो – देवेंद्र फडणवीस

इंद्रायणी काठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. तसेच माऊली मंदिर (Alandi) परिसरात हार फुलांच्या, साहित्याच्या दुकानामध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.