Alandi : आळंदी, वाकड, चिखलीमधून तीन दुचाकी पळविल्या!

एमपीसी न्यूज – आळंदी, वाकड आणि चिखली परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 11) गुन्हे दाखल केले आहेत.

पहिली घटना 7 फेब्रुवारी रोजी सकाळी पसायदान नगर, च-होली खुर्द येथे उघडकीस आली. किशोर दामू कु-हाडे (वय 35, रा. पसायदान नगर, च-होली खुर्द) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु-हाडे यांनी त्यांची एम एच 14 / ई बी 7899 ही दुचाकी 6 फेब्रुवारी रोजी रात्री घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

दुसरी घटना 9 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता थेरगाव येथे घडली. लोकेश मुकुट पाली (वय 40, रा. सुसगाव रोड, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाली यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 12 / जी बी 7606 ही दुचाकी थेरगाव येथील सनी बिअर शॉपी समोर सार्वजनिक रोडच्या बाजूला पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

तिसरी घटना 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. शिवानंद परमांद कुमार (वय 20, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या मैत्रिणीच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला मंगळवारी (दि. 11) दुपारी चार वाजता पार्क केली. चोरटयांनी लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार तीन तासानंतर उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.