Alandi : पूर्ववैमनस्यातून तिघांची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून तरुणाला तसेच त्याच्या आई, वडील आणि भावाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री साडेनऊच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली.

विकास दादाभाऊ पवार (वय 21, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अलका अनिल जगताप, आदेश अनिल जगताप महेश (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास आणि आरोपी अलका यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अलका आणि आदेश या दोघांनी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच आरोपी अलका आणि आदेश या दोघांच्या सांगण्यावरून आरोपी महेश याने विकास यांच्या डोक्यात लाकडी बॅटने मारहाण केली.

भांडण सोडविण्यासाठी विकास यांचे आई, वडील व भाऊ आले असता आरोपींनी त्यांनाही हाताने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.