Alandi News : आळंदी मधील ध्वनिक्षेपकांच्या,वाहनांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी ग्रामस्थांचे नगरपालिका व पोलिस प्रशासनास निवेदन

एमपीसी न्यूज : आळंदी येथे आळंदीकर ग्रामस्थ ,वारकरी व भाविक यांच्या वतीने आळंदी नगरपरिषद व आळंदी पोलिस यांना आळंदी शहरातील सार्वजनिक ठिकाणी (Alandi News) असणाऱ्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या पातळीवर बंधने व त्या आवाजाची पातळी सरकारी नियमानुसार मर्यादित ठेवण्याबाबत तसेच इतर समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
माऊली मंदिर परिसर व त्या जवळील परिसरात नो पार्किंग झोन असताना दुचाकी वाहने बिनधास्तपणे पार्कींग करतात त्यावर कार्यवाही करण्याबाबत, आळंदी शहरात मुख्य रस्त्यांवर चारचाकी गाड्यांच्या अस्ताव्यस्त पार्किंग मुळे वाहतूक कोंडीच्या होणाऱ्या त्रासाबाबत,काही रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर सम विषम तारखेस पार्किंग ची सुविधा इ.बाबत निवेदन देण्यात आले.
मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकाच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ ,बालक,आजारी व्यक्ती या सर्वांनाच त्रास होतो.बहिरेपणा ,अंगाचा थरकाप उडणे इ.आजार उदभवतात.यामुळे मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांवर शासकीय नियमानुसार बंधने आणावीत व आवाजाची पातळी सरकारी नियमानुसार मर्यादित ठेवावी.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर परिसर, महाद्वार ते सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज ट्रस्ट ,भराव रस्ता या रस्त्यांवर नो पार्कींग झोन असताना दुचाकी वाहने बिनधास्त पणे पार्किंग केल्या जातात.त्यामुळे भाविकांना नागरिकांना पायी चालता येत नाही.व अंत्यसंस्कारा साठी मयत नेत असताना त्या वाहनांचा अडसर निर्माण होतो.तसेच गाडी पार्किंग वरून वाद विवाद होऊन भांडणे होतात.त्यामुळे तेथील नो पार्किंग झोन मध्ये वाहने लावण्याऱ्यांवर कारवाई करावी.जेणेकरून भाविक व नागरिकांना या रस्त्यांवरून चालणे सुलभ होईल.
प्रदक्षिणा रोड,घुंडरे आळी रोड,चाकण रोड,केळगाव रोड,वडगांव रोड,नवीन पूल रोड,दत्त मंदिर रोड,देहू आळंदी रोड इत्यादी सर्व रोडवर चार चाकी वाहने सर्रासपणे अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जातात,त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते.व रुग्णवाहिका ,कामगार,वारकरी ,भाविक,नागरिक या सर्वांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतो.तसेच अनेक ठिकाणी वाद होऊन भांडणे होतात.(Alandi News) सदर रोडवर प्रायोगिक तत्वावर सम विषम तारखेनुसार पार्किंग असावी अशी यात सूचना करण्यात आली आहे.अशा सर्व बाबींचा त्या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.आळंदी पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक रमेश पाटील,पो.आ.शहाजी पवार यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.