Alandi : बेशिस्तपणे केलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज -आज (दि.18 )आळंदी मध्ये प्रदक्षिणा रस्त्यावर व वडगांव रस्त्यावर (Alandi ) बेशिस्त पणे दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने पार्किंग केल्याने मोठ्या प्रमाणात  वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.एकादशी निमित्त आलेल्या नागरिकांनी तसेच लग्नतिथी मुळे लग्न कार्यास आलेल्या बाहेरील नागरिकांनी तेथील कार्यालया समोरील रस्त्यावर  दुतर्फा चारचाकी,दुचाकी वाहने बेशिस्त पणे मोठ्या प्रमाणात पार्किंग केल्याचे दिसून येत होते.त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

 

 

Talegaon News : प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो – व. बा. बोधे

 

 

  तसेच आज एकादशी निमित्त बहुतांशी भाविकांचे पालिका चौक मार्गे व  चावडी चौक मार्गे  माऊलींच्या मंदिरात आगमन झाले होते. माऊलीं मंदिरात येणाऱ्या भाविकांना माऊलीं मंदिरा परिसरातील बेशिस्तपणे,बेकायदेशीर पणे नो पार्किंग च्या जागेत लावल्या दुचाकी इ. वाहनाने येण्या जाण्यास अडथळे निर्माण होत होते.

 

याबद्दल माहिती मंगेश तिताडे यांनी दिली. मंदिर परिसरातील नो पार्किंग च्या जागेत लागणाऱ्या दुचाकी वाहनां मुळे इतर वेळी ही भाविकांना त्रास होत असतो.त्यामुळे पालिका  व पोलीस प्रसाशनाने एकत्र येऊन संयुक्तपणे विचारविनिमय करून योग्य ती उपाय योजना येथे करणे गरजेचे आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.