Alandi news: इंद्रायणी नदीतून वाळू चोरणा-या दोघांना अटक; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीतून वाळू चोरून नेणा-या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 23) सकाळी सात वाजता पिंपळगाव तर्फे चाकण येथे इंद्रायणी नदीत करण्यात आली.

बजरंग दिनेश पाचपुते (वय 25, रा. मरकळ), संदीप जालिंदर शिवले (वय 23, रा. तुळापूर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बजरंग हा जेसीबी चालक आहे. तर आरोपी संदीप हा डंपर चालक आहे. हे दोघेजण मिळून पिंपळगाव तर्फे चाकण गावच्या हद्दीत सुपोते वस्ती लगत इंद्रायणी नदीपात्रातून वाळू चोरी करत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली. आरोपींकडून जेसीबी, डंपर आणि पाच ब्रास वाळू असा एकूण 35 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.