Alandi : गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी चोरीला

एमपीसी न्यूज – दारासमोर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नसल्याचा प्रकार आळंदी येथे उघडकीस आला आहे. घरासमोर बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास वडगाव घेनंद येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

बाबजी नारायण घेनंद वय 47, रा. वडगाव घेनंद। आळंदी रोड, ता. खेड यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बाबजी शेती करतात त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दिल्ली जातीच्या दोन म्हशी विकत घेतल्या आहेत रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांनी त्यांच्या दोन्ही म्हशी घरासमोर असलेल्या गोठ्यामध्ये बांधल्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही म्हशी चोरून नेल्या सोमवारी पहाटे चारच्या सुमारास बाबजी झोपेतून उठले असता हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.