Alandi : एका रात्रीत चोरट्यांनी पळवले दोन ट्रक; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केलेले दोन ट्रक अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेले. हा प्रकार 17 जानेवारी रोजी सकाळी चिंबळी फाटा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू तुकाराम गाडेकर (वय 46, रा. हजारेवस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू यांनी त्यांच्या मालकीचे अशोक लेलँड कंपनीचे एम एच 14 / जी यु 0585 आणि एम एच 14 / जी यु 9885 हे दोन ट्रक 16 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता चिंबळी फाटा येथे शिवशक्ती रोडवेज येथे लॉक करून पार्क केले होते.

अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत आठ लाख रुपये किमतीचे दोन्ही ट्रक चोरून नेले. 17 जानेवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 22 जानेवारी रोजी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.