Alandi : कचऱ्याचा त्रास सहन न झाल्याने नागरिकांनी कचराच रस्त्यावर लोटला

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण भागात (Alandi) चऱ्होली ग्रामपंचायती हद्दीतीत वडगाव रस्त्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग कडेला असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास रहदारी करणाऱ्या नागरिकांसह तेथील स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनासुद्धा सतत होत असल्याने काही नागरिकांनी तो कचरा तेथील रस्त्यावरच लोटून दिला.

येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला असतो. येथील कचरा रोज न उचलल्याने त्याचा मोठा ढीग तयार होऊन अस्वच्छता तर होतेच पण त्याच्या दुर्गंधीचाही त्रास येथील स्थानिकांना होत आहे. याबाबतची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. येथे कचरा होऊ नये, यासाठी ग्रामपंचायततर्फे उपाय योजना व्हावी. असेही त्यांनी सांगितले.

Mumbai : आरोग्य रत्न पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

चऱ्होली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या मरकळ रस्त्याच्या कडेनेसुद्धा अशा स्वरूपाचा कचरा दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.