Alandi : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतील माऊली बागेच्या वर्धापना दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सुंदरतेचा कळस असणाऱ्या माऊली बागेतील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती स्थापनेला 3 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले.

त्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे व त्यांच्या पत्नी वैशाली मुंगसे समवेत संस्थेचे सचिव अजित वडगावकर व त्यांच्या पत्नी मंजुषा वडगावकर यांच्या शुभहस्ते तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत माऊलींच्या मूर्तीचा अभिषेक व अजान वृक्षाचे रोपण करून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे औचित्य साधून सायं. 4 ते 5 या वेळेत ह.भ.प. घाडगे महाराज व त्यांचे विद्यार्थी यांच्या वतीने हरिपाठाचे, 5 ते 6 ह.भ.प. डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ यांचे प्रवचन व 6 ते 7 या वेळेत ह.भ.प. मानकरताई यांच्या संगीत भजन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Sports News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

यावेळी कार्यक्रमासाठी (Alandi) श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक प्रतिनिधी नारायण पिंगळे, शिक्षकेतर प्रतिनिधी सोमनाथ आल्हाट, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.