Alandi: वॉटर फिल्टरचे वेस्ट पाणी सोडण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

Alandi: Violent clashes between two groups over the release of waste water from a water filter आरोपींनी अगरबत्तीचे पितळी स्टॅन्ड, लाकडी काठी, विटेच्या साहाय्याने फिर्यादीला मारले.

एमपीसी न्यूज- वॉटर फिल्टरचे पाणी सोडण्याच्या कारणावरून ग्रामपंचायत कार्यालयात वाद झाला. यानंतर पुन्हा दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि.7) सकाळी खेड तालुक्यातील सोळू गावात घडली. याप्रकरणात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण बाळासाहेब ठाकूर (वय 25, रा. सोळू, ता. खेड) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सागर पाटीलबुवा गोडसे, किरण पाटीलबुवा गोडसे, विमल पाटीलबुवा गोडसे, काजल सागर गोडसे, प्रिया किरण गोडसे (सर्व रा. सोळू, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.5) फिर्यादी आणि आरोपी यांची ग्रामपंचायत कार्यालयात वॉटर फिल्टरचे वेस्ट पाणी सोडण्याच्या कारणावरून भांडण झाले होते.

त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी रविवारी सकाळी नऊच्या सुमारास किरण गावातील रस्त्यावर थांबले असता त्यांना मारहाण केली.

आरोपींनी अगरबत्तीचे पितळी स्टॅन्ड, लाकडी काठी, विटेच्या साहाय्याने फिर्यादी किरण यांना मारले. त्यात किरण यांच्या कानाच्या मागे दुखापत झाले.

तसेच आरोपींनी किरण यांच्या भावाला देखील शिवीगाळ करत मारहाण करून दुखापत केली असल्याचे किरण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात सागर पाटीलबुवा ठाकूर (वय 32, रा. सोळू, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी किरण बाळासाहेब ठाकूर, सुरज बाळासाहेब ठाकूर, बाळासाहेब आनंदा ठाकूर, मंगल बाळासाहेब ठाकूर, उज्वला शंकर ठाकूर, रोशनी शंकर ठाकूर (सर्व रा. सोळू, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सागर यांना तांब्या, रबरी केबल, हॉकीस्टिक, दांडक्याने मारहाण केली.

यात सागर यांच्या हातावर तर त्यांचा भाऊ किरण याच्या डोक्यावर दुखापत झाली आहे. आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.