Alandi : तांदळाच्या पैशावरून भावंडांमध्ये तुंबळ हाणामारी

Violent fight between siblings over rice money : खेड तालुक्यातील कोयाळी गावात ही घटना घडली.

एमपीसी न्यूज – तांदूळ विकल्यानंतर आलेल्या पैशाच्या वाटणीवरून दोन भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी सव्वा एकच्या सुमारास खेड तालुक्यातील कोयाळी गावात घडली.

याप्रकरणी  रामदास सखाराम वायदंडे (वय 47, रा. कोयाळी ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  पोलिसांनी तुकाराम सखाराम वायदंडे, सुमन तुकाराम वायदंडे, संजय तुकाराम वायदंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास यांच्या शेतामध्ये पिकविलेल्या तांदळाची विक्री करण्यात आली होती. त्यातून आलेल्या पैशांच्या वाटणीवरून रामदास आणि तुकाराम यांच्यामध्ये मंगळवारी दुपारी  वाद झाला.  आरोपी सुमन आणि संजय या दोघांनी फिर्यादी रामदास यांना पकडून ठेवले.

तर आरोपी तुकाराम याने रामदास यांच्या डोक्यावर मारहाण करत त्यांना दुःखापत केली. त्यानंतर रामदास यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याला देखील मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.