गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Alandi News : विश्रांतवडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याची ग्रामपंचायती मार्फत विल्हेवाट

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण भागात चऱ्होली ग्रामपंचायती हद्दीतील विश्रांतवडाकडे जाणाऱ्या वडगांव रस्त्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग (Alandi News) रस्त्याच्या कडेने होता. त्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा त्रास सहन न झाल्याने 23 जानेवारी रोजी संध्याकाळी तेथील काही नागरिकांनी तो कचरा रस्त्यावरच लोटला. याबाबत चे वृत्त प्रथम एमपीसी न्यूजने रात्री दि.23 रोजी प्रसारीत केले होते.या वृत्ताची ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेतली आहे.

Akurdi : आकुर्डीत अल्पवयीन मुलाला कोयत्यासह घेतले ताब्यात

या वृत्ताची ग्रामपंचायती ने दखल घेत दि.24 जानेवारी रोजी त्या रस्त्यावरील लोटलेल्या कचऱ्याची पूर्ण साफ सफाई कर्मचाऱ्यांद्वारे करत तो कचरा गाडी मध्ये भरून कचरा डेपो वर हलवण्यात आला.यामुळे येथील परिसर स्वच्छ झाला असून त्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Latest news
Related news