Alandi women molestation : आळंदीत कीर्तन ऐकायला गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज : परवानगी न घेता तू इथे किर्तन एकायला कशी काय आलीस, म्हणत महिलेला अपशब्द वापरत तिचा विनयभंग करण्यात आला. (Alandi women molestation) ही घटना गुरुवारी (दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास धोडोपंत धर्मशाळेत घडला.

याप्रकऱणी आळंदी पोलीस ठाण्यात 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून नवनाथ कोरके (रा. धोडोपंत धर्मशाळा) याच्या विरोधात गुन्ह दाखल कऱण्यात आला आहे.

AnnaSaheb Patil Jayanti : महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने आण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या धर्मशाळेत कीर्तन ऐकण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना तू उमेश काळे व नारायण सूर्यवंशी व श्रीमंत सत्यवान यांची परवानगी न घेता इथे का आलीस म्हणत शिवीगाळ व अपशब्द वापरून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. (Alandi women molestation) तसेच तू परत इथे आलीस तर 400 मुले आणून तुला ठार मारीन, अशी धमकी दिली. यावरून आळंदीत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.