Alandi: कार्तिकी एकादशी निमित्त माऊली मंदिरात फुलसजावटीच्या कामात कामगार मग्न

एमपीसी न्यूज – कार्तिकी (भागवत)एकादशी निमित्त (Alandi)संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन मंदिरात आकर्षक अशी फुलसजावट करण्यात येणार आहे.

त्याची आज (दि.8) सकाळ पासून मंदिरात लगबग दिसून येत आहे. विविध फुलांपासून(गुलाब,अष्टर ,झेंडू इ.)व इतर साहित्या पासून आकर्षक सजावटीच्या कामात कामगार मग्न असल्याचे दिसून येत होते.

Pune : अस्वच्छते प्रकरणी 26 हजार 863 नागरिकांना पुणे महापालिकेने ठोठावला 1.24 कोटी रुपयांचा दंड

माऊलींच्या संजीवन समाधी साठीच्या दर्शनासाठी (Alandi)आज नदीपलीकडील श्री वैतागेश्वर मंदिरा शेजारी असणाऱ्या दर्शन मंडपातून वारकरी भाविकांची रांग दिसून येत होती.नदी घाटावर पवित्र इंद्रायणीच्या स्नाना करिता मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.