Alandi: आळंदीत सूर्यग्रहण दिनी परंपरांचे पालन करत इंद्रायणी नदी घाटावर उपासना

Alandi: Worship on Indrayani river ghat following solar eclipse day traditions in Alandi आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी पाण्यात उभे राहून सूर्यग्रहण काळात अनेक साधकांनी साधना केली.

एमपीसी न्यूज- आळंदी येथील इंद्रायणी नदीत उपासकांनी सूर्यग्रहण काळात इंद्रायणी नदीच्या पात्रात उभे राहून परंपरांचे पालन करीत उपासना केली. शेकडो हिंदू साधक उपासकांनी या उपासनेत भाग घेतला. भारतीय संस्कृतीत ग्रहण काळात विविध धार्मिक साधना केल्या जातात. यामध्ये ध्यानधारणा, नामस्मरण, जप, आराधना करण्यात आली.

आळंदी मंदिरात जेष्ठ वद्य अमावस्या दिनी सूर्यग्रहणाच्या मोक्षानंतर आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांचे हस्ते श्रींच्या पादुकांची पुजा अभिषेक माउली मंदिर दर्शन बारी सभागृहात करण्यात आला. तसेच ग्रहण काळातील उपचार परंपरांचे पालन करीत करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली.

आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी पाण्यात उभे राहून सूर्यग्रहण काळात अनेक साधकांनी साधना केली. सूर्यग्रहण काळात ग्रंथ पठण, मंत्र जप साधना तसेच या अनुषंगाने विविध धार्मिक विधीची करीत परंपरेचे पालन केले.

इंद्रायणी नदीत साधकांनी उघड्या अंगाने साधना करीत सूर्य ग्रहण पूर्ण होताच इंद्रायणी स्नान करून पूजापाठ नाम साधना केली. सकाळी दहा ते दुपारी दिड या कालावधी सूर्यग्रहण असल्याने यावेळेत साधकांनी नदीत उभे राहून सूर्यग्रहण पाळले.

यावेळी नदीच्या पात्रात उपासना कारणाना साधकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत साधना केली. सूर्यग्रहण उपासनेचा काळ साधकांसाठी पर्वणी असून या काळातील साधनेने ज्ञान वाढत असल्याचे जाणकार सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात देखील प्रथा परंपरांचे पालन करीत सूर्यग्रहण धार्मिक उपासना पूजा, विधा परंपरेने झाले. श्रींच्या समाधीवर जलाभिषेक करण्यात आल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.