Alandi : भररस्त्यात अडवून तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘तीन-चार दिवसांपूर्वी भांडणात तू वाचलास. तू इथून कसा जातो ते बघतो’ अशी धमकी देत तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री बंगलावस्ती, कोयाळी येथे घडली.

सुरेश हनुमंत कोळेकर (वय 21, रा. बंगला वस्ती, कोयाळी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष तानाजी हंडगर, सत्यवान तानाजी हंडगर, प्रतीक सत्यवान हंडगर (सर्व रा. कोयाळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सातच्या सुमारास फिर्यादी सुरेश रस्त्यावर रनिंग करत होते. त्यावेळी आरोपी संतोष तिथे आला. त्याने त्याची दुचाकी आडवी लावून सुरेश यांना अडवके.

तीन-चार दिवसांपूर्वी भांडणात तू वाचलास. तू इथून कसा जातो ते बघतो’ अशी धमकी देत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी सत्यवान आणि प्रतीक यांना बोलावून घेऊन आणखी मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.