Alandi : धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तरुणास अटक

एमपीसी न्यूज – कोणताही परवाना न घेता तसेच पुरेशी सुरक्षितता न (Alandi) बाळगता बेकायदेशीर आणि धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तरुणाला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आळंदी मरकळ रोडवर धनेश्वर गॅस एजन्सी जवळ करण्यात आली.

संदीप नरसिंग लांडगे (वय 24, रा. मरकळ रोड, आळंदी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : शासन आपल्या दारी योजना फक्त दाखवायलाच आहे का? तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी मरकळ रोडवर धनेश्वर गॅस एजन्सीच्या पाठीमागे आरोपी संदीप हा विनापरवाना धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करत होता. त्याने ग्राहकांची परवानगी न घेता ज्ञानेश्वर गॅस एजन्सी, भोसले गॅस एजन्सी आणि खांदवे गॅस एजन्सी मधून सिलेंडर बुक करून ते आणले.

त्यातून रिकाम्या सिलेंडर मध्ये तो गॅस काढून घेत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत (Alandi) 62 हजार 800 रुपयांचा अवैध गॅस साठा आणि साहित्य जप्त केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.