Bhosari : दारू पिताना मित्रांमध्ये वाद, एकाला जबर मारहाण

एमपीसी न्यूज – दारू पित बसलेल्या दोन मित्रांमध्ये  किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्राला एकाने लाथाबुक्या, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना भोसरीतील धावडे वस्ती येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

नियाज शाकीर अन्सारी (वय-35, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत पवार ऊर्फ चंदु (रा. धावडे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पवार मित्र असून बुधवारी सायंकाळी धावडे वस्ती येथे दारू पित बसले होते. यावेळी फिर्यादीने आरोपीला तू माझ्या एटीएम कार्डमधून पैसे काढले का ? असे विचारले. यामुळे चिडलेल्या आरोपीने मी चोर आहे का? असे म्हणून शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. फिर्यादीला जखमी अवस्थेत त्यांच्या घरी सोडून त्यांच्या पत्नीला तुम्ही पोलीस तक्रार केली तर बघून घेईन, अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.