Talegaon Dabhade : रेल्वेच्या डब्यात चढताना हात सटकल्याने रेल्वेखाली सापडून प्रवाशाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- रेल्वेच्या डब्यात चढत असताना हात सटकल्याने रेल्वेगाडीखाली सापडून एका प्रवाशाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास झाला.

दीपक यशवंत लांघे (वय 54,रा. इंदोरी, ता मावळ, जि. पुणे) असे अपघात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

रेल्वे पोलीस संजय तोडमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक लांघे तळेगाव रेल्वे स्टेशनवर नांदेड – पनवेल एक्स्प्रेसच्या डब्यात चढत असताना त्यांचा हात सटकला आणि ते रेल्वेगाडीखाली सापडून गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा एक पाय तुटला. त्यांना त्वरित सोमटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार एस.जी.पठाण करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.