Alert…Next 3 Days Banks will closed : शुक्रवार ते रविवार तीन दिवस बँका बंद

आयकर भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतच मुदत!

एमपीसी न्यूज : बँक खातेधारकांनो जर तुमची बँकेची कामे काही कारणास्तव खोळंबली असतील तर ती येत्या तीन दिवसात उरकणे गरजेचे असणार आहे. कारण पुढील तीन दिवस बँक बंद राहणार आहेत. 

शुक्रवारी 25 डिसेंबरला नाताळची बँकांना सुट्टी असेल. तसेच प्रत्येक महिन्यात बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. त्यामुळे नाताळच्या दुसऱ्यादिवशी 26 डिसेंबरला चौथा शनिवार आला असून त्यानंतर रविवारी, 27 डिसेंबर म्हणजेच आठवड्याची सुट्टी असणार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

येत्या 31 डिसेंबरपर्यंत प्राप्तीकर (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी सरकारने मुदत दिली आहे. तो भरण्यासाठी तुम्हाला बँकेच्या कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास सुट्ट्यांमुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे बँकेची सर्व कामे करुन घेणे देखील गरजेचे आहे.

दरम्यान, पुढील आठवडा हा या वर्षातील शेवटचा आठवडा असल्याने 1 जानेवारी 2021 पासून बँकेच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने चेक पेमेंटसाठी नव्या वर्षापासून ‘पॉझिटिव पे सिस्टम’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेक पेमेंटमध्ये होणाऱ्या गैरवापरावर आळा घालण्याच्या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. तसेच आरटीजीएस सुविधेत बदल झाले आहेत. त्यामुळे आजच बँकेचे व्यवहार करून घ्या, ऑनलाईन बँकींग सुविधा देखील बंद राहण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.