Babri Masjid demolition : बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त

एमपीसी न्यूज – बाबरी मशीद प्रकरणात लखनऊमधील विशेष सीबीआय कोर्टात आज सुनावणी झाली असून, या प्रकरणाशी संबंधीत सर्व 32 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

तसेच या सुनावणी दरम्यान, 1992 मध्ये बाबरी मशीद पाडणे हे पूर्व नियोजित नसल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.  यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्य गोपाल दास हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यवाहीस उपस्थित राहिले होते. यांना वगळता सर्व आरोपी लखनौच्या विशेष सीबीआय कोर्टात दाखल झाले होते.

या सुनावणीसाठी कोर्टाने सर्व 32 आरोपींना आज न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.  तसेच सुनावणीपूर्वी कोर्टाच्या आवारात सुरक्षा कडक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.