Mission Akshay Campaign : मिशन अक्षय मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – अॅनिमीयाचे रुग्ण शोधून (Mission Akshay Campaign) त्यावर वेळेत उपचार करण्यासाठी महापालिका यंत्रणा काम करत आहे. आपले शहर  अॅनिमीया मुक्त असावे यासाठी सर्वांनी याबाबत जाणून घेवून मिशन अक्षय अर्थात अॅनिमीया मुक्त पीसीएमसी मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रत्येकाने सहभाग घेवून मोहिम यशस्वी करावी.  मिशन अक्षय मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी येथील महापालिका मुख्य इमारतीमध्ये आयुक्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक संपन्न झाली. अॅनिमीया आजारा विषयी समाजातील सर्व घटकांना माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून अॅनिमीया मुक्त पीसीएमसी मोहिम यशस्वी करण्यासाठी एनजीओसह सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्यासाठी तसेच विविध वैद्यकीय व्यावसायिक संघटना, एनजीओ, शासकीय आस्थापना, यांच्या सहभागाबाबत बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना (Mission Akshay Campaign) आयुक्त पाटील बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, आरसीएच अधिकारी तथा ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर, डॉ.राजेंद्र फिरके, डॉ.ऋतुजा लोखंडे, डॉ.शैलजा भावसार, डॉ.तृप्ती सागळे, डॉ.सुनिता साळवे, डॉ.संगिता तिरुमणी, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ.योगेश मंडपे, डॉ.शिवाजी ढगे, माध्यमिक शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदीप खोत, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.डी.एस.कामत,डॉ. व्ही.एच.सातव, निमा संघटनेचे डॉ.सत्यजित पाटील, डॉ.डी.बी.कोकाटे, डॉ. सुनिल पाटील, बाल विकास प्रकल्पाच्या मुख्यसेविका वंदना मोरे, पर्यवेक्षिका प्रितम नाराळे, जिल्हा रूग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी जाधव, डॉ.प्रणाली वेताळ, लायन्स क्लबचे दामाजी आसबे,  योगेश कदम, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

CM Uddhav Thackeray: राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या

आयुक्त पाटील म्हणाले, अॅनिमीया आजाराचे दुष्परिणाम सर्वांना समजल्यास ते या आजाराकडे गंभीरतेने पाहतील. यासाठी जनजागृती हाच मुख्य आधार आहे. त्या करिता अॅनिमीयाविषयी जनजागृती करण्यासाठी नियोजन करावे. भीत्ती पत्रके, चित्रफिती, संदेश, ध्वनिफिती, पथनाट्य अशा विविध माध्यमांचा वापर केला पाहिजे. झोपडपट्टी भागात महिला बचत गट आणि आशा स्वयंसेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन अॅनिमीया बद्दल माहिती पोहचवावी. अॅनिमीया सदृश लक्षणे दिसून आल्यास त्या रुग्णावर लगेच उपचार सुरु करणे गरजेचे आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये देखील विद्यार्थ्यांमध्ये याबाबत अनभिज्ञता असता कामा नये. शिक्षण व्यवस्थापन आणि पालक यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना अॅनिमीया संदर्भात इत्यंभुत माहिती दिली पाहिजे. गृह संस्थाना मिशन अक्षय मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. महापालिका दवाखाने आणि रूग्णालयांच्या कार्यक्षेत्रामध्ये हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करावे.

शहरातील सर्व दवाखाने आणि (Mission Akshay Campaign) रुग्णालयांमध्ये अॅनिमीया बद्दल माहिती देण्यासाठी यंत्रणा उभी करावी, अशा सूचना आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. अॅनिमीयाची मोफत तपासणी आणि उपचार महापालिकेच्यावतीने केले जाणार आहेत. खाजगी दवाखान्यांमध्ये अॅनिमीयाचे रुग्ण आढळून आल्यास त्यांनी याबाबतची माहिती महापालिकेला कळवावी. मिशन अक्षय मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश आयुक्त पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी मोहिम नियोजनाबाबत विविध सूचना मांडल्या. मोहिम नियोजनाबाबत डॉ.वर्षा डांगे यांनी संगणकिय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.