Lonavala :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे, घाट पर्यटनासाठी बंद

All dams in Pune district including Bhushi dam are closed for tourists due to coronavirus pandemic. यावर्षी देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुशी धरण व लोणावळा परिसर तसेच पुणे जिल्ह्यातील वरील सर्व धरण क्षेत्रांचा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील भुशी धरण पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे.

लोणावळ्यातील भुशी धरण व लोणावळा परिसरातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाटाचा परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर यावर्षी बंद ठेवण्यात येणार आहेत.

भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. धरण परिसरात अनेक पर्यटकांचे बुडून मृत्यू होतात.

कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. धरण क्षेत्रात पाऊस जास्त होत असल्याने धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढविला जातो व पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडतात. यावर्षी देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुशी धरण व लोणावळा परिसर तसेच पुणे जिल्ह्यातील वरील सर्व धरण क्षेत्रांचा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 188 न्वे कारवाई केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.