Lonavla News : राहुल शेट्टी खून प्रकरणातील चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 नोव्हेंबर पर्यत वाढ

एमपीसी न्यूज : शिवसेनेचे माजी लोणावळा शहरप्रमुख राहुल उमेशभाई शेट्टी खून प्रकरणातील चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत 3 नोव्हेंबर पर्यत वाढ झाली आहे.

 

26 आँक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास जयचंद चौकातील येवले चहाच्या दुकानाजवळ राहुल शेट्टी यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यत अटक करण्यात आलेले सुरज अगरवाल, दिपाली भिल्लारे मुख्य मारेकरी इब्राहिम युसुफ खान व मोहन उर्फ थापा देवबहाद्दर मल्ला या चौघांची आज पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या कोठडीत न्यायालयाने 3 नोव्हेंबर पर्यत (4 दिवसांची) वाढ केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

इब्राहिम खान ह्या मुख्य मारेकर्‍याकडून कालच लोणावळा पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल, 20 जिवंत काडतुसं, तीन कोयते, एक सुरा व इतर साहित्य अशी घातक हत्यारे ताब्यात घेण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.