Bhosari : मारहाण व विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा दोघांना अटक

एमपीसी न्यूजू – जुन्या भांडणाच्या कारणावरून आई व मुलाला मारहाण केली. तर मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 25 जानेवारी रोजी महात्मा फुले नगर दापोडी येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

अजित बाळासाहेब कांबळे (वय 32), अमित बाळासाहेब कांबळे (वय 28, दोघे रा. महात्मा फुले नगर, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बाळासाहेब नारायण कांबळे (वय 50) संगीता बाळासाहेब कांबळे (वय 45) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 48 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांचे जुन्या भांडणाच्या कारणावरून 25 जानेवारी रोजी पुन्हा भांडण झाले. आरोपींनी फिर्यादी महिला व त्यांच्या मुलाला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या मुलीशी गैरवर्तन करत आरोपी अमित याने तिचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या मुलाला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अजित आणि अमित यांना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1