Pune : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज – सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे सध्या संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या कायद्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त विरोध विद्यार्थी आंदोलनातून होत आहे. मात्र, पुण्यात याच्या उलट चित्र आज पाहायला मिळाले. हातात मशाल घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. 

पुण्यात बुधवारी एनएसयुआय ने या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी राजकीय हेतूंनी प्रेरित शक्ती विद्यार्थ्यांना हाताशी धरून आंदोलन घडवून आणत असून दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागणे हे देशहिताला बाधक आहे, असे मत यावेळी विद्यार्थ्यांमधून व्यक्त करण्यात आले.

तसेच या विद्यार्थ्यांनी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचेही समर्थन केले आहे. तर जे विद्यार्थी देशप्रेमी आहे त्यांना या कायद्याबाबत काहीच हरकत नाही. त्यांचे या कायद्याला समर्थनच आहे, असेही मत अभविप कडून व्यक्त करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.