Pune-Lonavala Local : पुणे – लोणावळा मार्गावरील सर्व लोकल 22 ऑगस्टपर्यंत पूर्ववत

एमपीसी न्यूज : – पुणे – लोणावळा मार्गावरील सर्व लोकल (Pune-Lonavala Local) सेवा 22 ऑगस्टपर्यंत पूर्ववत होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळवले आहे.

कोरोनामुळे पुणे लोणावळा मार्गावर 7 ऑगस्टपर्यंत तेरा जोडी लोकल (Pune-Lonavala Local) फेऱ्या चालवल्या जात होत्या. कोरोनातील बंद केलेल्या लोकल परत सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार चार लोकल फेऱ्या सुरु करण्यात आले आहेत.15 ऑगस्टपासून सहा लोकल फेऱ्या तर 22 ऑगस्टपासून चार लोकल फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येतील.

आठ ऑगस्टपासून सुरू झालेल्या चार लोकल फेऱ्या :

पुणे – तळेगाव लोकल ही पुण्याहून दुपारी 3.42 वा. रवाना होऊन तळेगावला 4.32 वाजता पोहोचेल. पुणे – लोणावळा लोकल ही रात्री 9.02 वाजता रवाना होऊन रात्री 10.22 वा.लोणावळ्याला पोहोचेल. तळेगाव-पुणे लोकल ही दुपारी 4.40 वा तळेगावहून रवाना होऊन पुण्याला संध्याकाळी 5.32 वा. पोहोचेल.

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सहा लोकल फेऱ्या :

पुणे – लोणावळा लोकल (Pune-Lonavala Local) ही रात्री 10.10 वाजता रवाना होऊन रात्री 11.30 वा लोणावळ्याला पोहोचेल. पुणे – लोणावळा लोकल ही पहाटे 4.45 वा पुण्याहून रवाना होऊन सकाळी 6.05 वा पुण्याला पोहोचेल.

लोणावळा –  पुणे लोकल ही सकाळी 5.20 वा लोणावळ्याहूनरवाना होईल व सकाळी 6.40 वा. पुण्याला पोहोचेल.

लोणावळा – पुणे लोकल लोणावळ्याहून रात्री 10.35 वा होईल व पुण्याला रात्री 11.50 वा.पोहोचेल. लोणावळा – पुणे लोकल ही लोणावळ्याहून रात्री 11.40 वा रवाना होईल व दुसऱ्या दिवशी रात्री 1.17 वा  पुण्याला पोहोचेल.

22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या चार लोकल फेऱ्या :

पुणे – तळेगाव लोकल ही पुण्याहून रात्री11.20 वा रवाना होईल व दुसऱ्या दिवशी 12.10 वा तळेगावला पोहोचेल.

पुणे – लोणावळा लोकल (Pune-Lonavala Local) ही पुण्याहून सकाळी 6.48 वा रवाना होईल व तळेगावला 7.38 वा पोहोचेल.

तळेगाव – पुणे लोकल ही तळेगावहून रात्री 12.35 वा.रवाना होईल व पहाटे 1.37 वा पुण्याला पोहोचेल.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झवर म्हणाले की, “पुणे लोणावळा मार्गावर एकूण 14 लोकल फेऱ्या परत सुरु होण्याने हजारो रेल्वे प्रवाशांना त्याचा लाभ होईल. दुपारी व रात्री उशिरा लोकल फेऱ्या नसल्याने लोकांना त्रास होत होता. तो यामुळे कमी होईल.”

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share