Vadgaon Maval : साखर कारखाना निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलला पाठिंबा – बाळा भेगडे

मावळ भाजपाच्या बैठकीत निर्णय

एमपीसी न्यूज- संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक ही सहकार क्षेत्रातील असल्यामुळे सर्वपक्षीय म्हणून भाजपा या निवडणुकीला सामोरे जात आहे असे स्पष्टीकरण माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिले. संत तुकाराम साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका भाजपा कार्यालयामध्ये पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मंगळवारी (दि.11) झाली. त्यावेळी बाळा भेगडे बोलत होते.

ज्येष्ठ नेते व तळेगावचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर, कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव टाकवे, सुभाषराव बोडके, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर उपसभापती दत्तात्रय शेवाळे, शांताराम कदम, प्रशांत ढोरे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, संतोष कुंभार, किरण राक्षे, किरण भिलारे अनंता कुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बाळा भेगडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत असताना ही निवडणुक सहकार क्षेत्रातील असल्याने सर्वपक्षीय म्हणून भाजपा या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सांगितले. तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने सर्वपक्षीय पॅनललाच निवडून देण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, शेतकरी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव शेलार, माजी सभापती धोंडिबा मराठे, एकनाथ टिळे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सरचिटणीस सुनील चव्हाण व प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.