Pune : सव्वादोन लाख कुत्र्यांची पुणेकरांवर दहशत

एमपीसी न्यूज – शहरात सव्वादोन लाख भटकी कुत्री असून त्यांची पुणेकरांवर प्रचंड दहशत आहे. सकाळी फिरायला जात असताना ही कुत्री पुणेकरांवर हल्ला करीत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात येत आहे. पुणे शहरात प्राणीमित्र संघटना जागरूक असल्याने या कुत्र्यांचे नेमके करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मध्यंतरी बाणेर – बालेवाडी भागांत अन्नात काही तरी पदार्थ टाकल्याने 15 ते 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला होता. शहराच्या सर्वच भागात कुत्रांच्या दहशतीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. काही हॉटेल चालक उरलेले मांसाहारी पदार्थ या भटक्या कुत्र्यांना टाकत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कुत्रे याचा भागांत वास्तव्याला प्राधान्य देतात.

कोथरूड, कर्वेनगर, वारजे – माळवाडी, वडगाव, धायरी, कात्रज, हडपसर, वडगावशेरी, बाणेर – बालेवाडी, बावधन भागांत भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. ही कुत्री चावल्यानंतर रेबीज लस तातडीने देणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्युमुखी पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, रात्री 10 नंतर ही कुत्री दाबा धरूनच बसलेली असतात. मिळेल त्या वाहनांवर भुंकत असतात. एखाद्या वेळी लाईट गेली असताना तेथून पायी जाणेही अवघड होऊन बसते.

या सव्वादोन लाख कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा यक्ष प्रश्न पुणे महापालिका प्रशासनासमोर पडला आहे. या भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशती बाबत नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.