Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या सातही रुग्णांना डिस्चार्ज, आरोग्यमंत्री म्हणतात…

एमपीसी न्यूज : पुण्यात BA- 4 आणि BA-5 या कोरोनाच्या (Corona) नवीन व्हेरिएंटची लागण झालेले सात रुग्ण आढळले होते. पुण्यात अशा प्रकारचे रुग्ण आढळून आल्यानंतर खरंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, या रुग्णांच्या बाबतीत एक दिलासादायक बातमी समोर आली. या सातही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील राजेश टोपे यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावा असा सल्ला देखील टोपे यांनी राज्यातील नागरिकांना दिला. 
जालन्यात बोलत असताना राजेश टोपे म्हणाले, नवीन व्हेरीएंटचे काही रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून तर काही रुग्ण दक्षिण भारतातून आले होते. यातील बहुतांश रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असल्यामुळे त्यांना कोणताही त्रास झाला नाही. या सर्व रुग्णांना रुग्णालयातील अखेर सुट्टी देण्यात आली आहे.

BA- 4 आणि BA-5 या नवीन व्हेरिएंटची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रात प्रथमच आढळले होते. हे सातही रुग्ण पुण्यातील होते. सात पैकी दोघे दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम येथून प्रवास करून आले होते. तिघेजण हे कर्नाटक आणि केरळ आतून आले होते तर इतर दोघांनी कुठेही प्रवास केल्याची नोंद नाही. महाराष्ट्रात प्रथमच या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने केलेल्या जनुकिय तपासणीत हे नवे व्हेरीएंट आढळले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची टेस्ट करण्याचे प्रमाणही वाढवण्यात आल्याचे राजेश टोपे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा, ज्या नागरिकांचे दोन दोष झालेले नाहीत त्यांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावे आणि गुटखा डोस देखील घ्यावा असे आवाहन राजेश टोपे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.