Pimpri : ऑल सोल्स डे निमित्त शहरातील ख्रिश्चन दफनभूमीत गर्दी

एमपीसी न्यूज – जगभर सर्वत्र दोन नोव्हेंबर हा ऑल सोल्स डे म्हणून साजरा केला जातो. ऑल सोल्स डे निमित्त पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सर्व ख्रिश्चन दफनभूमीमध्ये ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत पूर्वजांच्या आठवणीत एकच गर्दी केली.

पूर्वजांचा स्मरणोत्सव, आत्मादिन किंवा स्मरणदिन असेही या दिवसाला संबोधले जाते. ख्रिश्चन बांधव आजच्या दिवशी आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून ऑल सोल्स डे हा दिवस साजरा करतात. आजच्या दिवशी सायंकाळच्या वेळी दफनभूमीमध्ये जाऊन पूर्वजांच्या थडग्यावर फुले, सुगंधित अगरबत्ती व मेणबत्ती लावून त्यांच्या आवडीचे खाण्याचे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवतात. यावेळी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते. यावेळी मृत व्यक्तीच्या आत्म्यांस शांती मिळावी म्हणून सामुहिक प्रार्थना करण्यात येते. प्रत्येक चर्चचे फादर ही प्रार्थना घेतात. दापोडीतील होली क्रॉस चर्चचे फादर वॉल्टर सिंगारियन आदी फादरनी प्रार्थना घेतली.

पंधराव्या शतकापर्यंत ऑल सोल्स डे 1 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जात असे. या दिवशी इटली येथील मुख्य कॅथलिक चर्चला सुट्टी असते. परंतु त्या दिवशी ऑल संत डे (संतांचा दिवस) असल्याने पंधराव्या शतकापासूनच ऑल सोल्स डे 2 नोव्हेंबर रोजी साजरा होऊ लागला. काही ठिकाणी आजच्या दिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. आजच्या दिवशी आबालवृद्धांनी दफनभूमीमध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी प्रार्थना करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.