Talegaon Dabhade : परिचारिका दिनानिमित्त 150 ऍप्रनचे वाटप

एमपीसी न्यूज :  तळेगाव दाभाडे येथे 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पै.विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रात सर्व परिचारिकांना परिचारिका दिनानिमित्त 150 ऍप्रनचे वाटप करण्यात आले. 

वाटप कार्यक्रम तालुक्यातील सर्व केंद्रावर जावुन करण्यात आले संस्थेचे आधारस्तंभ माजी राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे, संस्थेचे संस्थापक गणेश किसनराव भेगडे,  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,उपनगराध्यक्ष सुशिल सैदांणे, गटनेते अरुण भेगडे, भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने व डाॅ. वामन गेंगजे,डाॅ. नेहा पदमाने उपस्थित  हाेते.

वडगाव मावळ  प्राथमिक आराेग्य केंद्रात पंचायत समितींच्या सभापती निकिता घाेटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे तसेच कामशेत केंद्राचे डाॅ. .गिरी उपस्थित होते. लाेणावळा येथे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी गटनेते देविदास कडु, भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल उपस्थित हाेते

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे संचालक सुनिल भेगडे यांनी केले. सर्व ठिकाणी संस्थेच्यावतीने आभार संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय नाटक यांनी म‍ानले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लाेणकर सचिव मंगेश सराेदे, संचालक अरुण भगवान भेगडे,अषिताेश हेंद्रे, समिर जाधव,राजु चाेपडे,संचालिका शाेभा परदेशी,संस्थेचे व्यवस्थापक संदिप वाळुंज,राजेंद्र बुटे,अजय भेगडे आणि सर्व केंद्रातील परिचारिका या कार्यक्रमास उपस्थित हाेत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.