Pune : पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेतील 1489 लाभार्थ्यांना विमा कार्ड वाटप

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 1489 लाभार्थ्यांना विमा कार्डचा वाटप सोहळा आयोजित केला आहे. शुक्रवारी (दि. 21) सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

खासदार गिरीश बापट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्डचे वाटप होणार आहे, अशी माहिती नगरसेविका आरती कोंढरे यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वरदा बापट यावेळी उपस्थित राहणार आहेत.

भारतरत्न श्रेध्येय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना लाभार्थी मेळावा आयोजित केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.