Cinema Halls Open : सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी 

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू नियमावलीत आणखी शिथिलता दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून एक फेब्रुवारी पासून देशातील सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. जावडेकर म्हणाले, एक फेब्रुवारी पासून देशातील सिनेमागृहे पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील. यापूर्वी क्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.

_MPC_DIR_MPU_II

तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमावली पाळणे आवश्यक असणार आहे. तसेच, ऑनलाईन पध्दतीने टिकिट विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जावडेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1