Vadgoan Maval : काकड आरती सोहळ्याला परवानगी द्या

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय वारकरी मंडळाचे वतीने आज वडगाव मावळ येथे मावळ तालुका कार्य क्षेत्रात काकड आरती सोहळा अखंडितपणे चालु राहण्यासाठी आमदार सुनिल शेळके, तहसिलदार मधुसुदन बर्गे, वडगाव पोलिस स्टेशन,सभापती, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मावळ तालुक्यात कोजागिरी पौर्णिमेच्या मुहुर्तावर काकड आरती सोहळा सुरु होत असुन कोविड19 विषाणुच्या पादुर्भावामुळे त्यात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे कोविड 19 च्या सरकारी नियमांअधिन राहुन १५ते२०वारकरी बंधु आणि यजमान अशा २२ लोकांना काकड आरती सोहळ्यासाठी परवानगी मिळावी. अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी सोपानराव म्हाळसकर, सुखदेव ठाकर, भरत वरघडे, संतोष कुंभार, दत्ता शिंदे, गोपिचंद कचरे, गणेश जांभळे, तुकाराम भांगरे , सचिन ठाकर, दिनकर निंबळे, राजाराम असवले,अनंता कुडे, नारायण ढोरे, लक्ष्मण काळे, मारुती वावरे,लक्ष्मण पारखी, दत्ता गरुड, तानाजी गुणाट आदी मंडळाचे पदाधिकारी हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.