Allow pujara to Play ODI : मी पुजाराला एकदिवसीय संघातून कधीच बाहेर ठेवले नसते – दिलीप दोशी

I would never have let Pujara out of the ODI team - Dilip Doshi : पुजाराला एकदिवसीय संघात खेळवले गेले तर त्याचा भारतीय संघाला खूप लाभ होऊ शकतो

एमपीसी न्यूज – चेतेश्‍वर पुजारावर कसोटी फलंदाज असा शिक्‍का बसलेला असला तरीही तो एकदिवसीय सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकतो. मी जर कर्णधार असतो तर त्याला एकदिवसीय संघातून कधीही बाहेर ठेवले नसते, असे सांगत भारताचे माजी कसोटीपटू दिलीप दोशी यांनी पुजाराला एकदिवसीय सामन्यांमध्येही खेळवले पाहिजे, असे मत व्यक्‍त केले आहे.

पुजाराला एकदिवसीय संघात खेळवले गेले तर त्याचा भारतीय संघाला खूप लाभ होऊ शकतो. त्याच्याकडे तंत्र आहे, संयम आहे. संघाचे सुरुवातीचे बळी गेले तर डाव सावरण्याची क्षमता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

दोशी पुढे म्हणाले, खरेतर संघनीती काळानुरूप बदलली आहे. पूर्वी संघाच्या 200-225 धावा झाल्या की सामना जिंकण्याच्या आशा वाढलेल्या असायच्या. आता त्रिशतकी धावाही कमी पडतात.

अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना एक बाजू सांभाळण्यासाठी पुजारासारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाचीच गरज असते. T20 क्रिकेटने सर्व आयाम बदलून टाकले असले तरी आजही तंत्रशुद्ध फलंदाजीला पर्याय नाही, असे दोषी म्हणाले.

चेतेश्वर पुजाराने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा पुजारा भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये मात्र पुजाराला आतापर्यंत फारशी संधीच मिळाली नाही. येत्या काळात त्याला वन डे संघात संधी मिळते का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.