Pimpri News : ‘दुर्गा देवी मंडळांना’ परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजनेस मंजुरी द्या – संतोष सौंदणकर

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाप्रमाणेच गरबा-दांडिया भरविण्यासाठी देखील दुर्गा देवी मंडळांना विनाअट परवानगी द्याव्यात. त्यासाठी एक खिडकी योजनेस मंजुरी द्यावी अशी मागणी, (Pimpri News) पिंपरी-चिंचवड शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात सौंदणकर यांनी म्हटले आहे की,  सध्या राज्यात नवरात्रौत्सवाचे वातावरण सुरू आहे. अशामध्ये आपल्या सरकारकडून नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी प्रतिबंध घातले आहेत. ही बाब हिंदुत्व जपण्यासाठी घातक आहे.

Talegaon-Dabhade : बनावट बँक खाते उघडून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक, चार जणांवर गुन्हा दाखल

गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या दिल्या. शुल्क देखील माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील गणेश भक्तांकडून आनंदात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.(Pimpri News) दुर्गा देवी मंडळांना बिनशर्त परवानगी द्यावी. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी मागणी सौंदणकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.