Alternative Apps:प्ले स्टोअरवरून चिनी अ‍ॅप्स हटवले; ईएस फाईल एक्सप्लोरर, कॅम स्कॅनर, टिकटॉकसाठी काय आहेत पर्याय ?

Alternative Apps: Chinese apps removed from Play Store; What are the options for ES File Explorer, Cam Scanner, TickTock? चिनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर बंदी आणल्यामुळे दररोजच्या वापरात येणाऱ्या यापैकी काही महत्वाचे अ‍ॅप्स आता वापरायला मिळणार नाहीत.

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने टिकटॉक, युसी ब्राउजर, शेयर इट, ईएस फाईल एक्सप्लोरर, कॅम स्कॅनर यांच्यासह 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा या कारणासाठी ही बंदी घातल्याचे सरकारने सांगितले आहे

बंदी घातल्यानंतर 24 तासांच्या आत प्ले स्टोअर वरून टिकटॉक हे चिनी अ‍ॅप्लिकेशन हटवण्यात आले आहे. चिनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर बंदी आणल्यामुळे दररोजच्या वापरात येणाऱ्या यापैकी काही महत्वाचे अ‍ॅप्स आता वापरायला मिळणार नाहीत.

यामध्ये ईएस फाईल एक्सप्लोरर, कॅम स्कॅनर आणि टिकटॉक यांचा समावेश आहे. प्ले स्टोअरवर या अ‍ॅप्लिकेशनसाठी इतर पर्यायी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. ही अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्यास सोपी तर आहेतच सोबत अधिक फिचर्स देखील पुरवतात.

मित्रो आणि चिंगारी: स्वतःचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनोरंजन संबंधित टिकटॉक हे चिनी अप्लिकेशन प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहे. त्यासाठी पर्याय म्हणून प्ले स्टोर वर मित्रो आणि चिंगारी ही दोन टिकटॉक सारखीच सुविधा पुरवणारी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत.

मित्रो फार कमी वेळात प्रसिद्ध झालेले देशी अ‍ॅप्लिकेशन आहे. तेव्हा टिकटॉक नंतर काय असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, अस्सल भारतीय असणारे मित्रो (Mitron) आणि चिंगारी (Chingari) ही दोन अ‍ॅप्लिकेशन्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.

कॅमस्कॅनरला बहू पर्याय उपलब्ध: कॅम स्कॅनर हे मोठ्याप्रमाणात वापरले जाणारे अ‍ॅप्लिकेशन आहे. कागदपत्र स्कॅन करण्यासाठी तसेच पीडीएफ तयार करण्यासाठी याचा जास्त वापर केला जातो.

मात्र, कॅम स्कॅनरसाठी खूप पर्याय उपलध आहेत जे अधिक फिचर्स देखील पुरवतात. यामध्ये अ‍ॅडोब स्कॅन (Adobe Scan), मायक्रोसॉफ्ट लेन्स (Microsoft Office Lens – PDF Scanner), पीडीएफ क्रिएटर (PDF Creator) यांचा समावेश आहे. ही अ‍ॅप्लिकेशन कॅम स्कॅनर ऐवजी वापरू शकता.

ईएस फाईल एक्सप्लोररसाठीचे पर्याय: ईएस फाईल एक्सप्लोरर मोबाईल मधील फाईल एका ठिकाणावरून दुसरीकडे मूव्ह तसेच इतर अ‍ॅप्स मॅनेज करायला उपयोगी पडत होते.

या चिनी अ‍ॅप्लिकेशन ऐवजी तुम्ही गूगलचे क्लीन अप स्पेस (Files by Google: Clean up space on your phone) तसेच फाईल कमांडर (File Commander – File Manager & Free Cloud) या सारखी अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता.

वरील सर्व अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉइड व आयओएससाठी उपलध आहेत. तसेच त्यांना मोबाईलमध्ये फार कमी स्पेस लागते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.