Pimpri : खासदार अमर साबळे यांची राज्यसभा पक्षप्रतोदपदी फेरनिवड

एमपीसी न्यूज – पार्लिमेंटरी एक्झिक्युटिव्ह कमिटी व राज्यसभेच्या पक्षप्रतोदपदी पुनः निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड भाजप पदाधिका-यांकडून खासदार अमर साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

साबळे यांनी नवीन मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा राज्यसभेतून पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल धन्यवाद दिले.

यावेळी साबळे यांनी, त्यांचा झालेला सत्कार हा भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पक्षश्रेष्ठींनी केलेला सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच माझ्यावर दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.