Amar singh Passed : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन  

गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. : Rajya Sabha MP Amar Singh passes away

एमपीसी न्यूज – समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे आज सिंगापूरमध्ये निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘एनडीटिव्ही’ने हे वृत्त दिले आहे.

अमर सिंह यांच्यावर गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्यावर सिंगापूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते.  अलिकडेच त्यांचं किडनी ट्रांसप्लांट झालं होतं.

अमर सिंह यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सार्वजनिक जीवनात सर्व पक्षांबरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते तसेच ते ऊर्जावान व विनोदी स्वभावाचे होते असे राजनाथ सिंह यांनी ट्वीट् केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.