Kamshet News : अमेचर वायरलेस टेलिग्राफ स्टेशनचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज : गोपी शेट्टी यांच्या वायरलेसचा मावळ तालुक्यातील नॉट रीचेबल गावात संपर्क साधण्यासाठी उपयोग केला जाईल. या वायरलेस स्टेशनला राज्य व केंद्र सरकार कडून मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करील असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.

 इंद्रायणी कॉलनी (कामशेत) येथे  अमेचर वायरलेस टेलिग्राफ स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी रविवार (दि.१) रोजी शेळके बोलत होते. याप्रसंगी माजी सरपंच तानाजी दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे, किरण परळीकर, गोपी शेट्टी,  विजय दौंडे, सुधीर वीर, संतोष काळे, रोहिदास वाळुंज, विष्णू गायखे,  संजय पडावकर, समीर ढमाले, भगवान गुरव, योगेश सातकर, शंकर पिंगळे यांच्यासह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत त्या ठिकाणी वायरलेस उपयोगी पडते. या वायरलेसचा उपयोग नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अतिशय मदत होते. गोपी शेट्टी यांनी या वायरलेसच्या माध्यमातून पूर, चक्री वादळ, भूकंप, भु सखलन, त्सुनामी आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये वायरलेस खुपच आवश्यक आहे. या वायरलेस स्टेशन मधून २७ देशांशी संपर्क करण्यात येतो असे शेळके यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गोपी शेट्टी म्हणाले, हे वायरलेस नैसर्गिक आपत्ती काळात जनतेच्या संवादासाठी मोफत उपयोग केला जाणार आहे. वायरलेस स्टेशनसाठी विद्यार्थ्यांना १० दिवसाचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र देणार आहे. या वायरलेस चा उपयोग पोलिसांसाठी पण केला जात आहे. आभार प्रशांत भालेराव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.