Education News : जेईई आणि इतर परीक्षांच्या तयारीसाठी आता ‘ॲमेझॉन ॲकॅडमी’

0

एमपीसी न्यूज: ॲमेझॉनने आता जेईई परीक्षांच्या तयारीसाठी ॲमेझॉन ॲकॅडमी या संकेतस्थळाची व ॲपची घोषणा केली आहे. यांमध्ये विद्यार्थी जेईई तज्ज्ञ शिक्षकांकडून लाईव्ह धडे घेऊन असलेल्या शंकांचे निरसनही करू शकणार आहेत. तसेच कधीही आणि कोणत्याही वेळेत सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकणार आहे. या संकेतस्थळाचे नाव https://www.academy.amazon.in/ असे आहे.

या संकेतस्थळावर जेईईचा अभ्यासक्रमासंबंधित आणि इतर अभियांत्रिकी परीक्षांसंबंधी सगळी माहिती उपलब्ध आहे. यांत ॲमेझॉनने All India Mock Test Series (AIMTS) असा पर्याय दिला आहे. यांमध्ये विद्यार्थी सराव प्रश्नपत्रिका सोडवून संपूर्ण भारतात त्याला कितवी रॅंक मिळाली आहे, हेदेखील जाणून घेऊ शकणार आहे.

प्रत्येक विषयांमधील तुमची प्रगती यांमधून तपासता येणार आहे. जेईईतील तज्ञ शिक्षक सराव परीक्षेसाठी पश्नावली तयार करणार असून, ती सोडवण्याची संधीदेखील विद्यार्थ्यांना यांमधून मिळणार आहे. यां संकेतस्थळामध्ये विविध प्रश्नांचा संच, आत्मविश्वास वाढण्यासाठी हिंट्सच्या साहाय्याने प्रश्न सोडवण्याचा पर्याय तसेच टप्याटप्याने उत्तरे सोडवणयाची पद्धत, रोज मिळणा-या जेईई टिप्स, शॉर्टकट्स आणि परीक्षेच्या टिप्स अशा विविध गोष्टी आता जेईई विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

प्रत्येक धड्याची परीक्षा, मागील वर्षांचे पेपर सेट, अर्ध्या-पूर्ण अभ्यासक्रमांची परीक्षा असे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ॲपवर विद्यार्थ्याला त्याची नोंदणी करावी लागणार आहे. ‘ॲमेझॉन ॲकॅडमी’ या नावाने ॲप प्लेस्टोअरवर उपलब्ध असून ॲपलच्या स्टोअरवर मात्र हे अजून उपलब्ध झाले नाहीये. प्लेस्टोअरवर 1 दशलक्षांहून अधिक लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.