Amazon News : जेफ बेझोस सोडणार ‘ॲमेझॉन’चे सीईओ पद

एमपीसी न्यूज: ॲमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे यावर्षी कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहेत. अँडी जेसी आता कंपनीच्या सीईओ पदाचा कारभार सांभाळणार आहेत.

57 वर्षीय जेफ बेझोस आता कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असून हा बदल 2021 च्या मध्यानंतर होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जेफ बेझोस हे सीईओ पदावरून जरी पायउतार होत असले तरी त्यांचा ॲमेझॉनच्या मोठ्या उपक्रमांमध्ये सहभाग राहणार असल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे. तसेच ते कंपनीचे सर्वांत मोठे शेअर होल्डरही राहणार आहेत.

अँडी जेसी हे सध्या वेब सर्विस आणि क्लाऊड कंप्युटिंग विभागाचे प्रमुख आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पीचई यांनी यावेळी जेफ बेझोस आणि अँडी जेसी या दोघांनाही नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या असून त्यांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.