Ambegaon : जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने डोक्यात वार; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगाव परिसरात जुन्या भांडणाच्या (Ambegaon)रागातून एकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. 20 मे च्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील हरणाई कॉम्प्लेक्स मध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम अंकुश शिंदे, सनी सोमनाथ शिंदे, करण पटेकर, गणेश बाबू ओव्हाळ उर्फ भावड्या आणि भिमशा सुरेश चव्हाण या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत पूर्णिमा रामदास माने (वय 42) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Khadki : घराशेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने केला महिलेचा विनयभंग

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी त्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये मुलगा चंद्रकांत माने यांच्यासह उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चंद्रकांत माने यांच्यासोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात धारदार हत्याराने वार केले.
फिर्यादीने हा वार चुकविला असता आरोपींनी दारूच्या मोकळ्या बाटल्या आणि दगड फेकून चंद्रकांत माने याला जखमी केले. फिर्यादी यांची मुलगी भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपींनी तिला वाईट शिवीगाळ करून घरदार संपून टाकीन अशी धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Ambegaon)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.