Ambegaon adulteration Crime : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त तूप बनविणाऱ्या विरुद्ध कारवाई

एमपीसी न्यूज : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने  (Ambegaon adulteration Crime)

आंबेगाव बु. पुणे येथील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या विकी कुमार बिल्डींगमधील गोदाम जवळील पेढीवर छापा टाकून 22 हजार रुपये किंमतीचे 88 किलो भेसळयुक्त तूप व 11 हजार 97 रुपये किंमतीचे 73 किलो वनस्पती असा एकुण रुपये 33 हजार 96 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

भेसळयुक्त पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी विक्रेत्याविरुद्ध तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड अर्ज दाखल करुन रुपये 10 हजार तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदा कायदा 2006 अंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सहआयुक्त (अन्न) संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) रमाकांत कुलकर्णी व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही (Ambegaon adulteration Crime) कारवाई केली.

Talgaon Fraud : चांगल्या परताव्याचे आमिष देऊन 1 कोटींची फसवणूक; आरोपी परदेशी फरार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.