Ambegaon Crime : शाळकरी मुलामध्ये खुन्नस, नववीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Crime) अवसरी खुर्द येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुना वाद डोक्यात ठेवून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. शाळेच्या मैदानावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एखादा चित्रपटात शोभेल असा हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेत कुणाल विकास कराळे हा पंधरा वर्षे विद्यार्थी जखमी झाला आहे. कुणाल हा नववीच्या वर्गात शिकतोय. त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Pune News : शहरात जागोजागी लावलेले I LOVE चे फलक हटवण्याचे आदेश

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कुणाल कराळे आणि (Ambegaon Crime) दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी शिक्षकांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले हे होते. मात्र दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने याचा राग मनात ठेवला. त्याने बुधवारी शाळेत लपवून कोयता आणला होता. यावेळी कुणाल पुढे जात असताना त्यांनी शाळेच्या मैदानावरच त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला.

दहावीच्या विद्यार्थ्याने कुणालच्या डोक्यात तीन ते चार वार केले. यामध्ये त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या कुणाला शाळेतील शिक्षकांनी तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.