Ambegaon : मीना नदीमध्ये बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज – आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेली तीन मुले मीना नदीत बुडाली. या मुलांचे मृतदेह आज, सोमवारी सकाळी एनडीआरएफ पथकाच्या हाती लागलेले आहेत. ही घटना रविवारी (दि.29) घडली.

प्रणय राजेंद्र वाव्हळ(वय -16), वैभव चिंतामण वाव्हळ (वय-15), श्रेयस सुधीर वाव्हळ (वय-15) अशी या मुलांची नावे आहेत. वैभव, प्रणय आणि श्रेयस तिघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. रविवार तसेच घटस्थापनेची सुट्टी असल्याने तिघेजण नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. मात्र, हा आनंद त्यांच्या जीवावर बेतला. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी शोध मोहिमेसाठी आंबेगावचे तहसीलदार, मंचर पोलीस उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.