Ambegaon : उसाच्या पाचटाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा जळून मृत्यू

एमपीसी न्यूज- उसाच्या पाचटाला लावलेल्या आगीत बिबट्याच्या पाच बछड्यांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेमुळे शेतात आश्रय घेणाऱ्या बिबट्याच्या पाच बछड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

खेड-आंबेगाव- जुन्नर शिरुर परिसरात सध्या ऊस तोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अवसरी बुद्रुक येथील गोपीनाथ सखाराम गुंणगे यांच्या शेतात आज, बुधवारी सकाळी ऊसतोड कामगार ऊस तोडणीसाठी आले. तोडणी झाल्यानंतर उसाच्या शेतातील पाचटाला आग लावण्यात आली. हे ऊसाचे पाचट जळत असताना बिबट्याची पाच पिल्ले दडून बसली होती. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे या आगीमध्ये हे बछडे होरपळून मृत्युमुखी पडले.

मात्र आता मादी बिबट्या आक्रमक होण्याच्या भीतीने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये अतिशय हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.